फुलांची आवक वाढली

0

चिंचवड । श्रावण मासानिमित्त बाजारात फुलांची आवक वाढली असून, भाव स्थिर आहेत. मात्र, फुलांना मागणी स्थिर असल्याचे बाजारात चित्र दिसत आहे. श्रावण महिन्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत सत्यनारायण पूजेकरिता केळीची खुंट, बेलाची पाने व फळांना मागणी वाढली आहे. फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे : झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)- 50 ते 60 रुपये किलो, बत्तासा व गोल्डन शेवंती- 140 ते 160 रुपये किलो, गुलछडी- 150 ते 160 रुपये किलो, लिली बंडल- 12 ते 15 रुपये, जरबेरा बंडल- 50 ते 60 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 10 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 60 ते 80 रुपये, अष्टर गड्डी (चार नग)- 15 रुपये, अबोली 80 ते 100 रुपये बंडल, जुई बंडल 150 ते 200 रुपये बंडल.