भुसावळ । शहरातील महात्मा फुले नगर परिसरात रस्त्यात टाकलेल्या खाटेमुळे वाहनांची ये-जा करतांना अडथळा निर्माण झाल्याने संबंधित व्यक्तिस खाट बाजुला करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने झालेल्या तलवार हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहे. दोघे जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महात्मा फुले नगर येथील रहिवासी दिलीप रामलाल जोनवाल यांनी त्यांंच्या घरासमोर रस्त्यावर खाट टाकलेली होती. मात्र यामुळे वाहने काढण्यास अडथळा निर्माण होत असल्याने अनिल उखा सोनवणे (वय 38) यांनी खाट बाजुला सारण्याचे सांगितल्याने दिलीप रामलाल जोनवाल याने अनिल सोनवणेे यांच्या डोक्यात तलवार मारुन दुखापत केली तर सुनिल व बंटी जोनवाल यांनी समाधान सोनवणे यांना विटने मारहाण केली. याबाबत अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.