जैताणे । क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 3 री वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या चेअरमन सायंकाबाई हरी माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हा परिषद सदस्या इंदूबाई वेडू खैरनार यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. संस्थापक मानद सचिव पंढरीनाथ सोनवणे यांनी आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतिचा आढावा सभागृहात मांडला. पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षाखेर 1 लाख 2 हजार 226 इतका निव्वळ नफा असल्याचे सांगितले. संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार नफा वाटनीस सभेत मंजुरी देण्यात आली.