फुले मार्केटमधील सील केलेल्या गाळेधारकांकडून करणार दंड वसूल

0

जळगाव: फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केट येथील सील केलेल्या गाळेधारकांना सील उघडण्यासाठी नियमानुसार दंड आकारणी करावी, अशी सूचना उपायुक्तांनी किरकोळ वसुली विभागाला दिली आहे.

मनपा मालकीच्या महात्मा फुले मार्केट आणि सेन्ट्रल फुले मार्केटमध्ये कारवाई करीत असताना काही गाळेधारकांनी मुळ दुकानात पोटभाडेकरु ठेवण्यासाठी अनधिकृत बांधकाम करुन कपाट आणि दुकानाला दोन शटर बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित 13 गाळे एकाबाजूने सील करण्यात आले आहेत.मात्र प्रशासनाच्या कारवाईविरोधात दोन गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपिल केले असून उर्वरित गाळेधारकांनी सील उघडून देण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी उपायुक्त मुठे यांनी अनधिकृत केलेले बांधकाम काढून त्याचा पंचनामा करावा आणि नियमानुसार दंडाची आकारणी केल्यानंतरच सील उघडून देण्याची सूचना किरकोळ वसुली विभागाला दिली आहे.