फुले मार्केटमध्ये दोन तरुणांवर फायटरने हल्ला ; एक गंभीर

0

जळगाव- शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी फुले मार्केटमध्ये कांचनगरातील दोन तरुणांवर फायटरने हल्ला केल्याची घटना 8.30 वाजेच्या सुमारास घडली. दिपक सुकलाल सोनवणे वय 19, चेतन रविंद्र कोळी वय 21 दोघे रा. कांचननगर, अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान या घटनेनंतर फुले मार्केटमध्ये एकच पळापळ काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान 15 रोजी तरुणाच्या वादाची या घटनेला किनार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्राथमिक माहिती अशी की, दिपक सुकलाल सोनवणे व चेतन रविंद्र कोळी हे दोघे कामावरुन फुले मार्केटमधून जात होते. यादरम्यान अचानक घोळक्याने आलेल्या तरुणाने दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात एकाने दिपक यांच्यावर फायटरने वार केला. यात त्याच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चेतनवर फायटरने मारहाण केली. यात चेतनच्याही हाताला दुखापत झाली आहे. दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी जमली होती.

अफवेने मार्केटमध्ये पळापळ
दरम्यान या घटनेने अफवा पसरून मार्केेटसह रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या वाहनधारकांसह नागरिकांध्ये एकच धावपळ उडाली. दरम्यान माहराण करणारे रिक्षातून आल्याची माहिती मिळाली आहे. या मारहाणीप्रकरीण शहर पोलिसांनी चार ते पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कय्युम देशमुख नगरातील तरुण अकिल शेख मजिद कुरेशी वय 26 याला 15 रोजी बेदम मारहाण झाली होती. याच वादातून ही घटना घडल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.