फुले मार्केट परीसरातील अल्पवयीन मुलीला पळवले

a minor girl from ranaway the fule market area जळगाव : अल्पवयीन युवतीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावात येताच युवतीला पळवले
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून गुरूवार, 18 ऑगस्ट रोजी नातेवाईकांसह ती जळगावच्या फुले मार्केट परीसरात आली मात्र त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने तिला पळवले. शोध घेवूनही अल्पवयीन युवती न आढळल्याने शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भदाणे करीत आहे.