लोणावळा : जागतिक महिला दिनाच्या निमित्त लोणावळ्यातील रणरागिनी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत रुपाली न्हालवे या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
महिला दिनाच्या निमित्त महिलांकरिता नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन रणरागिनी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजुश्री वाघ व नगरसेविका सेजल परमार, अर्पणा बुटाला, बिंद्रा गणात्रा, गौरी मावकर, जयश्री आहेर, कल्पना आखाडे, सदस्या श्वेता वर्तक, आशाताई खिल्लारे, यमुना साळवे, विद्या तारे, भोकसे, माधुरी पाळेकर, रंजना दुर्गे, अनिता धायगुडे, भांगरे, कल्पना पानसरे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, उद्योजक मुकेश परमार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये नेहा गवळी, जयश्री अंबुरे, आरती कनुजे, मनिषा बोडके, अश्विनी हेमाडे ह्या भाग्यवान विजेत्या ठरल्या.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा निकाल : रुपाली न्हालवे (प्रथम क्रमांक – पैठणी), नुतन मानकर (द्वितीय – सोन्याची नथ), स्वाती वहिरा (तृतीय – छल्ला), नेहा भांगरे (चतुर्थ – पैंजन), वैजयंती पवार (पाचवा – जोडवी)
वैयक्तिक नृत्य स्पर्धा निकाल : लहान गट : पौर्णिमा शेळके (प्रथम), अक्षरा अंबाडी (द्वितीय), निकिता स्वामी (तृतीय), प्रणाली ससाणे व छाया अंभोरे (उत्तेजनार्थ).
मोठा गट : निराली नालेकर (प्रथम), पुर्वा गायकवाड (द्वितीय), रुपाली माळवे (तृतीय), मंजुळा कदम, नियती भोईर व अंजली जेधे (उत्तेजनार्थ).
समुह नृत्य स्पर्धा : लहान गटात खंडाळा येथिल खंडाळा ग्रुप व मोठ्या गटात झिम पोरी झिम गटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान लोणावळा शहरात वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉ. सुधा सोमन, वकिली क्षेत्रात काम करणार्या अॅड. निलिमा खिरे, शिक्षण क्षेत्रात काम करणार्या प्रगती साळवेकर व जिमानॅस्टिक क्षेत्रात काम करणार्या ज्योती कंधारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रणरागिनी ग्रुपच्या महिला सदस्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून रमेश बोंद्रे व सौ. मते यांनी काम पाहिले तर कपिल पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.