फॅन्सी नंबर वाहनधारकांवर कारवाई करण्याची आवश्यकता

0

भुसावळ । राज्य उपप्रादेशिक परिवहन विभागाने निर्देशित केलेल्या नियमांना केराची टोपली दाखवत शहर आणि विभागात वाहनांवर नंबर टाकून देणारी दुकाने अनेकांनी थाटली आहेत. या दुकानांवर नियमांनुसार वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा करताच परस्पर नंबर टाकून दिले जातात.

शिवाय दादा, भाऊ, राम, राज आदीं नावे नंबरच्या स्वरुपात टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहने खरेदीनंतर त्याचा नोंदणी क्रमांक कसा असावा? हे वाहनांच्या प्रकारावर अवलंबून असते. मात्र, वाहन खरेदी केल्यानंतर या नियमांकडे वाहनचालकांपासून तर आटीओ विभागाचे दूर्लक्ष होते. शहरातील अनेक भगात वाहनांवर नोंदणी क्रमांक टाकणे, फॅन्सी नंबर प्लेट बनवून देणारी दुकाने आहेत. या दुकानांवर वाहन क्रमांकाची खातरजमा न करताच नंबर टाकून दिले जातात. यामुळे अंतर्गत सुरक्षा धोक्यात येवू शकते. दरम्यान, रोजगारासाठी अनेक जण हा व्यवसाय करत असले तरी चेसीस नंबर आणि वाहन नोंदणी क्रमांकाची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे.