मुंबई : मधुर भंडारकर यांचा सुपरहिट चित्रपट ‘फॅशन’ २००८ साली प्रदर्शित झाला होता. प्रियांका चोप्रा, कंगना राणौत आणि मुग्धा गोडसे यांची प्रमुख भूमिका होती. चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. फॅशनविश्वाची काळी बाजू या चित्रपटात दाखविले गेले आहे. फॅशन प्रदर्शित होऊन नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली. मधुर भंडारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टीमचे पुन्हा एकदा आभार मानले.
फॅशन चित्रपट एकूण ३ तास १० मिनिटांचा होता मात्र अनेक प्रसंगाना कट करावे लागले त्यामुळे तो अडीच तासाचा झाला. यात अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर दाखवायच्या राहून गेल्या. त्यामुळे सिक्वलमध्ये अशाच काही खऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे असं मधुर भंडारकर म्हणाले.