फेकरी टोल नाक्याजवळ खड्डा चुकवताना ट्रक उलटला : केळी रोपे रस्त्यावर

भुसावळ : जळगाव येथून जैन एरीगेशन येथून केळीची रोपे भरून मध्यप्रदेशातील शहापूर येथे जात असलेला ट्रकला तालुक्यातील फेकरी टोल नाक्याच्या अलिकडे रस्त्यावरील खड्डा चुकवितांना उलटला. या अपघातात केळीची रोपे रस्त्यावर पडली. हा अपघात मंगळवारी रात्री 8.30 वाजता घडला.

अपघातामुळे वाहतूक ठप्प
मंगळवारी जळगाव येथील जैन एरीगेशन येथून केळीची रोपे भरून मध्य प्रदेशातील शहापूर येथे जात असलेला ट्रक (एम.पी.12 जी.ए.0502) हा फेकरी टोलनाक्याच्या अलिकडे असलेला खड्डा वाचवित असतांना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चालक गोकुळ फकिरा महाजन(रा.शहापूर, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रेमचंद सपकाळे करीत आहे.