भुसावळ- वरणगाव रोडवरील फेकरी शिवारात प्रकाश बर्हाटे यांच्या शेतात 45 वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह 8 रोजी आढळला असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलिसांनी नागरीकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. मयताच्या डोक्यावर टक्कल पडले असून केस काळे-पांढरे, उजाव्या हाताच्या बोटात पांढर्या व पिवळ्या धातूच्या अंगठ्या, अंगठीवर अतुल लिहिलेले असून उजव्या हाताच्या कामेवर अस्पष्ट गोंदलेले आहे, अंगात फिकट आकाशी रंगाचा चौकडी नक्षीचा शर्ट व फिकट हिरव्या रंगाची पँट आहे. मृतदेहाची ओळख पटत असल्यास तालुका पोलिस ठाण्याचे नाईक प्रेमचंद सपकाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.