फेडररचे निवृत्तीचे संकेत

0

नवी दिल्ली । दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. फेडरर डेव्हिसकप स्पर्धेतून पुन्हा निवृत्त होत असून आणि आणखी एका ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. यावर्षी फेडररला तू कधी निवृत्त होणार या प्रश्‍नाचा वारंवार सामना करावा लागत आहे. मी डेव्हिस चषक स्पर्धेतून अधिकृतरित्या निवृत्त झालेलो नाही. पण, कारकिर्दीच्या या उंबरठ्यावर या स्तरावर खेळण्याची शक्यता कमी आहे, असे फेडररने नुकतेच स्पष्ट केले होते. 2017 पूर्वी सलग पाच वर्षे फेडररला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती. दुखापतींमुळे आणि नोवाक जोकोव्हिच आणि अँडी मरेचा खेळ उंचावल्यावर फेडररला 17 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांमध्ये भर टाकता येणार नाही असे वाटत होते. पण आठव्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकल्यावर फेडररने यावर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत स्थान मिळवून सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्याशिवाय राफेल नदालपाठोपाठ जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवत यंदाच्या मोेसमाची फेडररने सांगता केली.