फेडरर आठव्यांदा विम्बल्डन विजेता

0

लंडन । क्रोएशियाच्या मरिन सिलिचला सरळ सेटमध्ये ६-३,६-१,६-१ ने नमवून रॉजर फेडररने विम्बल्डन पुरूष एकेरीचा अंतिम सामना सहज खिशात घातला.

त्याचे हे आठवे विम्बल्डन विजेतेपद. पीट साम्प्रासचा विक्रम मागे टाकून फेडररने ग्रासकोर्टचा बादशाह हा लौकिक सार्थ ठरविला.