फेडरर, जोकोविच अंतिम 16 मध्ये दाखल

0

विम्बल्डन । रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचने सेंटर कोर्टवर झालेल्या आपापल्या लढतींमध्ये सरशी मिळवत विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम 16 जणांमध्ये स्थान मिळवले आहे. सात वेळा विम्बल्डंन जिंकणार्‍या रॉजर फेडररने 15 वेळा स्पर्धेतील अंतिम 16 जणांमध्ये प्रवेश केला. तर जोकोविचची अंतिम 16 जणांमध्ये स्थान मिळवायची ही 10 वी वेळ आहे. फेडररने जर्मनीच्या मिशा ज्वेरेवला 7-6(7-3), 6-4, 6-4 असे हरवले. पुढील लढतीत फेडररचा सामना बेबी फुड या नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल. फेडररने दिमित्रोव्हचे कौतुक करताना सांगितले की, त्याच्याविरुद्ध खेळताना प्रत्येक सामन्यागणीक त्याचा खेळ उंचावत असल्याचे पहायला मिळाले.

जोकोविचचा सहज तीन सेटमध्ये विजय
आतापर्यत तीनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणार्‍या जोकोविचनने लॅटिव्हीयाच्या अर्नर्स्ट गुलबिसला हरवले. हा सामना जोकोविचने 6-4, 6-1-,7-6 (7-2) असा जिंकला होता. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी जोकोविचला फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मानारिनोचा अडथळा पार करावा लागणार आहे.