न्यायालयाने दिला कठोर कारवाईचा इशारा
बारामती : बारामती नगरपालिकेस बारामती शहरातील फेरीवाला झोन समिती तयार करण्यास अद्यापही वेळ मिळालेला नाही. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फेरीवाला क्षेत्र निर्माण करण्यासाठी तातडीने समिती तयार करावी. अन्यथा उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही म्हटले आहे.
बारामती नगरपालिका याबाबत कोणतीही ठोस भ्ाुमिका घेताना दिसत नाही. बारामती शहरात मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचे मोठया प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे पादचार्यास फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. बारामती शहरातील सिनेमा रोड, इंदापूर चौक, भिकवण चौक, तीन हत्ती चौक या ठिकाणी पार्कींगच्या जागी भाजीमंडईच झाली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या आसपास व समोर फेरीवाल्यांनी सर्व जागा व्यापल्या आहेत. तरीही नगरपालिकेस जाग येत नाही. याविषयी बारामतीकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
शहरात पार्कींगचा प्रश्न गहण बनला आहे. नगरपालिकेने फेरीवाला झोन समिती निर्माण करून फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे जेणेकरून हा प्रश्न शहरातील हा गंभीर प्रश्न सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेणे नगरपालिकेने तातडीने झोन समिती निर्माण करावी. अशी बर्याच महिन्यापासूनची मागणी आहे. यामुळे हा प्रश्न सुटणार असून फेरीवाल्यांना न्याय मिळेल तसेच पादचार्यांचा त्रास कमी होऊन बारामती शहरातील पार्कींगची समस्या सुटण्यास मदत होईल. असे बारामतीकरांनी सांगितले.