फेरीवाल्यांवर धडक कारवाई

0

मनोर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसांपूर्वी बोईसर येथील मुख्य रस्त्यालगत बसणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर एक पाऊल पुढे जात संबंध बोईसरवासीयांना सोबत घेऊन का दिवसांपूर्वी बोईसर येथे बैठक घेऊन काही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याकरिता आवाहन केले होते.

त्यावेळी सर्वांनी एकूणच फेरीवाल्यांमुळे होणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या होणार्‍या त्रासाकरिता चिंताव्यक्त करत या वर कठोर कारवाई झालीच पाहिजे याबाबत घेतलेल्या पुढाकाराकरिता शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर तहसीलदारांच्या पत्राची दखल घेत आज बोईसर येथील मुख्य रस्त्यालगत बसणार्‍यांवर कडक कारवाईला सुरुवात केली. सकाळपासून चित्रालय ते बोईसर रेल्वे स्टेशनपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पालवे, बोईसर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोमनाथ कदम तसेच सर्व संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायतचे पदाधिकारी सहभागी झाले होते.