‘फेअर अॅण्ड लव्हली’ गर्ल यामी झाली ३० वर्षांची

0

मुंबई : ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री यामी गौतमचा आज ३० वा वाढदिवस आहे. यामी मूळची हिमाचल प्रदेशची आहे. मात्र तिचे लहानपण चंडीगढमध्ये गेले. तिचे वडील मुकेश गौतम पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.

यामीला कधीही अभिनेत्री व्हायचं नहव्ते. तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे ती कायद्याचे शिक्षणही घेत होती. यामी २० वर्षांची असताना तिचे मन बदलले आणि चित्रपटसृष्टीत येण्यासाठी ती मुंबईला गेली. बॉलीवूडमध्ये येण्याआधी यामीने कन्नड चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर तिने पंजाबी आणि तेलुगू चित्रपटात देखील काम केले.

यामीला चहाची प्रचंड आवड आहे. तिला चहासाठी कुणी विचारले तर ती कधी त्याला नकार देत नाही. यामी विदेश दौऱ्यावर जरी असली तरी ती सोबत एक चहाची किट ठेवते.