फेसबुकच्या शेरील सँडबर्ग म्हणतात….

0

न्यूयॉर्क: फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरील सँडबर्ग यांनी तमाम उद्योजकांना सांगितलंय की महिलांना चांगला पगार द्या आणि त्यांना कंपनीच्या समर्थ धोरणांचा आधार द्या. शेरील फेसबुकच्या संचालक मंडळात प्रवेश मिळविणारी पहिली महिला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लिंगभेदावर हल्ला चढवला.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शेरील यांनी माझं पहिलं पाऊल महिलांना चांगला पगार देण हेच असत. स्त्रीपुरूष समानतेबाबत त्यांची निरीक्षण नजरेआड करता येत नाहीत. मुलींना आपण अगदी लहानपणापासून सांगतो की तुम्ही पुढाकार घेऊ नका. नेतृत्व करू नका. मुलांना मात्र त्यात प्रोत्साहन देतो. नेतृत्वगुणांना लिंगभेदापलिकडे जाऊन प्रोत्साहन दिले पाहिजे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शेरील यांनी आपल्या पतीच्या निधनाबद्दल सांगितले. मी खूप रडले. इतक कुणी रडलं नसेल. पण आपण कसं सावरलं हे सांगताना त्या म्हणतात माझी बहिण म्हणाली त्यात काय विशेष तुझ्या शरीरात ७० टक्के पाणीच आहे. रडत बसून कार्याचा नाश करायचा नाही, असं त्या महिलांना सांगतात. २०१३ मध्ये त्यांचं लिन इन हे महिला सक्षमीकरणावर पुस्तक आलं. ते बेस्टसेलर झालं.

बीबीसीच्या मुलाखतीत महिला मागे का राहतात हे सांगताना शेरील म्हणतात की त्या स्वतःला पुरूषांपेक्षा कमी समजतात. स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणं संपवा, तरच तुमची किंमत तुम्हाला व इतरांना कळेल. पगार पण वाढेल, अस महिलांना त्या कळकळीन सांगतात. महिलांनी यातून बाहेर आलं पाहिजे म्हणून आपल्याकडे धोरण पाहिजे.

माझ्या पतीच्या निधनानंतर मी बदलले. फेसबुक कर्मचाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर रजेचा कालावधी २० दिवस म्हणजेच दुप्पट केला, असे शेरीन म्हणाल्या. कंपनीतल्या माणसांना आत्मविश्वास द्या. त्यांना वेळ द्या. त्यांचे प्रकल्प जीव ओतून करण्यास त्यांना तयार करा, असे शेरीन यांना वाटते.