फेसबुकने वाचवले महिलेचे प्राण

0

न्यूयॉर्क – सोशल मिडियाला चिकटून राहणारे नेहमीच टीकेचे धनी होतात. पण आपण कसा वापर करू त्यावरच एखाद्या गोष्टीचा बरेवाईटपणा ठरतो. अमेरिकेतील 61 वर्षीय महिलेचे प्राण फेसबुकमुळे वाचल्याची घटना घडली असून ने सोशल मिडियाचा वापर कसा चांगल्या मार्गाने करता येतो हे दाखवून दिले आहे.

 

 

न्यूहॅम्पशायर येथील लेस्ली कॉम नावाची महिला स्वीमिंग पुलमध्ये पोहून झाल्यावर शिडीवरून वर येत होती. अचानक शिडीच तुटली आणि ती पूलमध्ये अडकून पडली. अन्य दुसरा सुटकेचा मार्ग नव्हता. तिला त्यावेळी फेसबुक आणि तिचा ग्रुप आठवला. तिने ताबडतोब आयपॅडवरून आपल्या फेसबुकवर प्राण वाचवा अर्थात एसओएसचा संदेश पाठवला. ग्रुप मेंबरने सूत्रे हलवली आणि तिला सुखरूप स्वीमिंग पूलमधून बाहेर काढले.