फेसबुकवर अश्‍लील मेसेज पाठवणार्‍याला गमवावी लागली नोकरी

0

नवी दिल्ली । गुजरात दंग्यावर पुस्तक लिहिणार्‍या पत्रकार राणा अयुब यांना फेसबुकवर अश्‍लील मेसेज करून ट्रोल करणार्‍या एका व्यक्तीला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला असून, त्याची रवानगी आता दुबईवर भारतात झाली आहे. ट्रोल करणार्‍या या व्यक्तीच्या मेसेजचे अयुब यांनी स्क्रिनशॉट काढून तो काम करत असलेल्या कंपनीला पाठवले होते, कंपनीनेही त्याची दखल घेऊन त्याला कामावरून काढून टाकले आहे.

राणा यांना मेसेज करणार्‍या व्यक्तीचे नाव बिन्सीलाल असून तो मूळचा केरळचा आहे. तो दुबईतील एका पेंट कंपनीत नोकरी करतो. बिन्सीलाल याने काही दिवसांपूर्वी अश्‍लील भाषेत अयुब यांना त्यांच्या पेजवर मेसेज केले होते. या मॅसेजचा स्क्रीन शॉट काढत त्यांनी बिन्सीलाल यांना टॅग करत ते फोटो ट्विट केले होते. माझ्या फेसबुक पेजवर येणार्‍या किळसवाण्या मेसेजचा हा एक नमुना पाहा. अशा लोकांना नावासकट समोर आणून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे ट्विट अयुब यांनी केले होते.

दुबईत सायबर लॉ कडक असल्यामुळे दिल्लीत करणार बन्सीविरोधात तक्रार
अयुबच्या ट्विटने सोशल मीडियात एकच खळबळ उडाली. त्यांनी ते ट्विट बिन्सी काम करणार्‍या कंपनीला टॅग केले होेते. त्यामुळे कंपनीला त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी लगेच बिन्सीबाबत माहिती काढली. बिन्सी हा त्यांच्याच कंपनीत काम करत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेच त्याला कामावरून काढलं. बिन्सीचं अलीकडेच लग्न झाले आहे. अरब देशात अशा प्रकरणी गंभीर कारवाई केली जाते. याची कल्पना अयुबला असल्याने अयुबनं लगेच देश सोडण्याची परवानगी मागितली आणि तो भारतात रवाना झाला आहे. दुबईमध्ये सायबर क्राइमविषयी कठोर कायदे आहेत. तिथल्या कायद्यानुसार त्याला आजन्य कारावास आणि 50 हजार दिरहॅम ते 30 लाख दिरहॅमपर्यंतचा दंड बसू शकतो, तर दुसरीकडे अयुब आता नवी दिल्लीमध्ये बिन्सीविरोधात तक्रार दाखल करणार आहे.