भिवंडी : सहा महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये नोकरीला असताना तरुणीशी जवळीक साधलेल्या मित्राने लग्नानंतरही फेसबुकवर एकत्रित काढलेले फोटो अपलोड करून बदनामी केल्याने नारपोली पोलिसांनी या प्रेमवेड्या तरुणाला सोमवारी गजाआड केले आहे. अशिष सुनिल येवते (२२ रा.मानपाडा,ठाणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नांव आहे.
त्याने सहा महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये नोकरीला असताना काल्हेर येथील तरुणीशी जवळीक साधली होती.या दोघांमध्ये प्रेमभावना वाढल्याने दोघांचे हिंडणेफिरणेही झाले होते.या दोघांनी एकत्रितपणे फोटो काढून आपली हौस भागवली होती.या दरम्यान अशिषने तरुणीला मोठ्या बढाया मारून आपली श्रीमंती दाखवली होती.मात्र अशिष याने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे काहीच दिसून येत नसल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडून टाकले व जानेवारीत लग्न करून नारपोली येथील सासर गाठले.मन जडलेल्या प्रेयसीने अचानक फसवले या नैराश्यातून अशीषने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला.त्यानंतर त्याने प्रेयसीसोबत काढलेले फोटो तिच्या व भावाच्या फेसबुकवर टाकून तिची बदनामी केली.या प्रकाराने घाबरलेल्या नवविवाहितेने नारपोली पोलीस ठाणे गाठून बदनामी करणाऱ्या अशिष याच्याविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ क, ६६ ई अन्वये गुन्हा दाखल केला