फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर येणार निर्बंध?

0

नवी दिल्ली । सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून अनेक घटना आज आपल्याला कळतात तसेच एक मनोरंजन म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं ही माहिती दिलीय. सध्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी सरकारची भूमिका आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्राय ही संस्था आहे. मात्र, अशी यंत्रणा सोशल मीडियासाठी नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, यात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप, जी-टॉकसारख्या सेवांचा यांत समावेश आहे.सोशल मीडिया या सध्याच्या काळात संवादाचे सर्वांत मोठं साधन आहे. इथं चालणार्‍या संवादावर आणि इथल्या डेटाचा उपयोग अनेक कंपन्या या कंपन्या व्यावसायिक वापरासाठी करत होत्या. त्यावर निर्बंध घालण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारचे मत मागवले होते. या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत सरकारने न्यायालयात दिले आहेत. हे निर्बंध कशाप्रकारचे असतील हे स्पष्ट नसले तरी याबाबतची पुढील सुनावणी 18 एप्रिलला होईल. त्यामुळे सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सरकार काय मत मांडते हे आता 18 एप्रिललाच कळू शकेल.