फेसबुक मैत्रिणीने 2 कोटींना गंडविले!

0

मुंबई। अंधेरीतील एका व्यापार्‍याला अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महागात पडले आहे. या व्यापार्‍याला फेसबुकवरुन एक कोटी 80 लाख रुपयाला चुना लावला गेला आहे. हा व्यापारी काका जुलैमध्ये विक्टोरिया केटरशी फेसबुकद्वारे संपर्कात आला होता. नंतर दोघामध्ये वारंवार बोलणें होतं होते. आरोपी केटर स्वत:ला ब्रिटनमधील गुड हेल्थ फार्मासूटिकल लिमिटेडच्या डायरक्टेरची पीए असल्याचे सांगत होती.

400 ग्रॅम अक्रोडाची खरेदी 6500 रुपयांत
तिची कंपनी भारतातून अक्रोडं बियाणे खरेदी करते. पण काही कारणामुळे डिलरने बियाण्याचा पुरवठा बंद केला आहे,असे सांगत तिने टाकलेल्या फासात हा व्यापारी अडकला. तिने काकाला पैशांचे लालच दिले. ती म्हणाली की, 400 ग्राम अक्रोडाची भारतात किंमत 2, 750 रुपये आहे. हेच आक्रोड आमची कंपनी 6500 रुपयाला खरेदी करते. तिने काकाला ब्रिटनमधील अनेक अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांकही दिले होते. दरम्यान तिने काकाला संदीप सुवर्णचा मोबाईल क्रमांक दिला व तो आक्रोडाच्या बियाण्याचा सप्लायर असल्याचे सांगितले. काकाने त्याला बियाण्यांची ऑर्डर देत 1.8 कोटी रुपयेही पाठवले. पण ऑर्डरप्रमाणे संदीपने पुरवठा केला नाही. फसवणुकीची जाणिव झाल्यावर काकाने थेट पोलीस स्टेशन गाठले . सायबर क्राईम पोलीसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये नायजेरियन लोकांचा समावेश आहे. सोशल मिडियातील लाघवी चॅटींगच्या आहारी जाऊन लोभाला भुलणार्‍या लोकांनी हे विदेशी भामटे लगेच हेरतात, वेगवेगळ्या मुद्यांवर गप्पा मारुन चॅटींग करणार्‍या व्यक्तीचा स्वभाव व मनस्थिती समजून घेतल्यावर त्याला ठकविण्यासाठी पुढच्या युक्त्या वापरतात.