‘फेसबुक लाईव्ह’च्या नादात जिवाला मुकले!

0

नागपूर । रविवारच्या सुट्टीनिमित्त नागपुरातील काही तरुण इथल्याच वेणा नदीवर सहलीसाठी गेले होते. सहलीचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी बोटिंगचा प्लॅन आखला. मात्र हा प्लॅन त्या तरुणांच्या जिवावर बेतला. वेणा नदीत या 11 तरुणांची बोट बुडून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांना वाचण्यात यश आले आहे. तर सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित तरुणांचा शोध सुरू आहे. रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. तसेच बुडणार्‍यांमध्ये दोन नाविकांसह एका पर्यटकाचा समावेश आहे.

पोहता आले असते तर…
जलाशयात गेलेल्या या तरुणांनी दुर्घटनेपूर्वी फेसबुक लाईव्हही केले होते. यावेळी त्यांनी असेही म्हटले आहे की, आमच्या पैकी कुणालाही पोहता येत नाही. पोहायला शिकलो असतो तर बरं झालं असतं. आमच्या बोटीत पाणी शिरत आहे… अशा संवादातून या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. यानंतर त्यांना कळण्याअगोदरच त्यांची बोट पाण्यात बुडाली. संध्याकाळी दुर्घटनेनंतर तातडीने शोधकार्य सुरू झाले होते. मात्र अंधारामुळे काही वेळाने शोधकार्य थांबवण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी सुरू झाले.