जळगावच्या तरुणाला पुणे पोलिसांकडून अटक ; लग्नाचे आमिष देवून केली फसवणूक
जळगाव- फेसबुक, व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी जळगावच्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती, लग्नाच्या कार्यक्रमानिमित्ताने पुणे येथील अल्पवयीन मुलगी सात ते आठ महिन्यांपूर्वी कुटूंबियासमवेत जळगावला आली होती. यादरम्यान तरुणाची आणि तिची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. त्यानंतर तरुणील फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्रीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार करत लग्नास नकार दिला. तरुणाने आपली फसवूणक केल्याचे लक्षात आल्यावर मुलीने घडलेला प्रकार आईला कथन केल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी तरुणाविरोधात बिबवेवाडी पोलिसाता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील पोलिसांनी रविवारी जळगाव गाठले व शहर पोस्टे तील गुन्हे शोध पथकातील प्रितम पाटील, रतन गीते व संजय भालेराव यांच्या मदतीने तरुणाला अटक केली.
फेसबुक रिक्वेस्ट अन् फसली पोरगी
बळीराम पेठ येथील गौरव चंदनकर असे तरुणाचे नावे आहे. जळगावात नजरानजर झाल्यानंतर गौरवने मे 2018 मुलीचा फेसबुकवरुन हुडकून काढले. तिचा फे्रन्ड रिक्वेस्ट पाठविली. फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारली अन् मुलगी फसली. यानंतर त्याने तीन ते चार महिने चॅटींग करत प्रेमाचे जाळे टाकले. तिचा प्रेमासाठी मागणी घातली. आंधळ्या प्रेमाची मुलीला भुरळ पडली, अन् तिने होकारही दर्शविला. यानंतर एकमेकांचे फोन नंबर मिळवित व्हॉटस् अॅप, फेसबुकवर दोघांचे प्रेम चांगलेच बहरले.
पुण्यातील लॉजवर चार वेळा केला अत्याचार
तुझ्याची लग्न करायचे असे सांगत मुलीला भेटण्यासाठी गौरव मित्रासोबत 14 नोव्हेंबर 2018 रोजी पुण्याला गेला. प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलगीही तिच्या मैत्रिणीला घेत त्याला भेटायला गेली. यावेळी मित्र व तिची मैत्रिण या दोघांना एका हॉटेलात सोडून तो गप्पा मारण्याच्या बहाण्याने मुलीला लॉजवर घेवून गेला. अन् जबरदस्तीने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. अत्याचाराबाबत तुझ्या घरच्यांना सांगण्याची धमकी देत पुन्हा 16 तारखेला येण्याची धमकी दिली.
महागडे गिफ्ट देवून जिंकले तरुणीचे मन
यादरम्यान त्याने मुलीला व तिच्या मैत्रिणीला मोठ्या मॉलमध्ये महागडे कपडे खरेदी करुन दिले. यानंतर मुलीला सोनाटा कंपनीची घड्याळ भेट तरुणीचे मन जिंकले. यानंतर 16 रोजी पुन्हा लॉजवरच दोन वेळा अत्याचार केला. व यावेळी त्याने तिचे अश्लिल फोटा व व्हिडीओ शुटींगही केले. तु आता कुणाचीही होवू शकत नाही, तुला एडस् होईल अशी भिती दाखवली. धमकीच्या भीतीपोटी मुलीने कुणालाही प्रकार सांगितला नाही.
माझ्यावर खरे प्रेम करते तर हात कापून व्हिडीओ पाठव
अत्याचारानंतरही तरुणाने मन भरले नाही, त्याने मुलीचा छळ सुरुच ठेवला. 22 रोजी तरुणाने फेसबुकवरुन तरुणीला तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर तुझ्या हातावर कापून घे व त्याचे फोटो व व्हीडीओ मला पाठव असे म्हणत मानसिक छळ केला. प्रेमात वेड्या झालेल्या मुलीनेही मांडीवरुन कापून त्याचा व्हीडीओ पाठविला व अन् प्रेम सिध्द केले. यानंतरही तरुणाने तिला लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे कळाल्यावर मुलीने 23 रोजी तिच्या आईला सर्व हकीकत कथन केली.