फेस ता. शहादा । बंदिस्त गटार योजनेचे काम अर्धवट केल्याने ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाच सहा महीन्यापूर्वी या गटारिचे काम अर्धवट झालेले असून याकडे ग्रामपंचायत लक्ष देण्यास तयार नाही. काम अर्धवट झालेले असतांना पाच सहा महीन्यात ठेकेदार देखील या कामाकडे फिरकलेला नाही. त्यामूळे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराचा त्रास किती दिवस सहन करावा लागेल. असा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गटारितून जाणारे सांडपाणी गावालगतच मोकाट सोडल्यामूळे दूर्गधीयूक्त परीसर झाला आहे. सांडपाण्याची मोठी डाब भरलेली आहे त्यामूळे गावात डासांचा प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मलेरिया, टाईफाइड, डेंगू सारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.