फैजपूर – शहरातील सुभाष चौकातील धनजीशेठ रेस्टॉरंट पाठीमागील राजकुअर पान सेंटर चोरट्यांनी फोडून अडोतीस हजार रुपयांचा सामान लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व सुभाष चौक बसस्थानक मार्गावरील पाकिजा टी हाउसला लागून असलेल्या भर रस्त्यावरील शेख उमर शेख सत्तार यांच्या मालकीचे राजकुमार सेंटरच्या टपरीच्या खालील बाजूस असलेले फाटक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सिगारेट आदी साहित्य मिळून तीस हजार व मस्जिदची दान पेटीसह असा एकूण अडोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.