फैजपूर:- हिंदू-मुस्लिम एकता चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचे स्पर्धेला शहरात मंगळवार, 27 पासून प्रारंभ होत आहे. शहरातील म्युनिसीपल हायस्कूलमागील बाजूस असलेल्या लोकसेवक कै.बाळासाहेब मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात हिंदू-मुस्लिम एकता चषक भव्य नाईट कॉस्को बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सायंकाळी सात वाजता माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होईल. दीपप्रज्वालन उपनगराध्यक्ष कलीम खां मन्यार यांच्याहस्ते होईल. अध्यक्षस्थानी मसाका चेअरमन शरद महाजन असतील. क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षीस रोख 31 हजार 540 रुपये ट्रॉफी व विजेत्या खेळाडूंना टी शर्ट व दुसरे बक्षीस 15 हजार 540 ट्रॉफी व टी शर्ट असे बक्षीस देण्यात येईल.
यांनी केले स्पर्धेचे आयोजन
या नाईट टुर्नामेंटचे आयोजन उपनगराध्यक्ष कलिम खां मन्यार, डॉ.दानिश अहमद, शेख वसीम जनाब, मोहम्मद रियाजुद्दीन, एजाज सर, मुजम्मील काजी हुसैन बोहराजी, शेख मोहसीन यांनी या टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत औरंगाबाद, खामगाव, मालेगाव, अकोला व जळगांव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, रावेर, या तालुक्यातील 40 संघ सहभागी झाले आहेत. सहभागासाठी क्रिकेट संघांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.