फैजपुरात वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0

फैजपूर- शहरातील एका 80 वर्षीय वृद्धाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गोपाळ गणपत कोळी (दक्षिण बाहेर पेठ कोळीवाडा) मयत वृद्धाचे नाव आहे. शहरातील जुन्या पिंपरूळ रोड वरील विष्णू रंगू कोल्हे यांच्या शेतातील विहिरीत गोपाळ कोळी यांचे प्रेत आढळले. या आत्महत्येप्रकरणी शशिकांत कोळी यांनी खबर दिल्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत. दरम्यान, वृद्धाने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.