फैजपुरात सासर्‍यानेच केला शिक्षिका सुनेचा विनयभंग

0

फैजपूर:- मुलाला भेटण्यासाठी आलेल्या 35 वर्षीय शिक्षिकेचा असता सासर्‍यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना फैजपूरात मंगळवारी घडली. पीडीत शिक्षिका ही आमोदा येथे आई-वडिलांकडे राहते. मंगळवारी दुपारी 2 ते 2.15 वाजेच्या दरम्यान पिडीत शिक्षिका ही फैजपूर येथे सासू सासर्‍यांकडे राहण्यार्‍या आपल्या लहान मुलाला भेटण्यासाठी आली असता मुलगा झोपला असताना बेडरूममध्ये येऊन सासरा असलेल्या डॉ.शरदचंद्र फकिरा कोल्हे (रा. गजानन वाडी, फैजपूर) विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडितेने सासर्‍याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड केली असता उजव्या कानातील डिंगल खाली पडले व बोटारील अंगठी सासर्‍याने काढून घेतली यात पीडित शिक्षिका यांच्या कानाला व बोटाला मार लागल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तपास एपीआय दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामलाल साठे, कॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.