फैजपुरात 50 हजारांचा गुटखा जप्त : एकाविरुद्ध गुन्हा

0

फैजपूर : शहरात अवैधरीत्या विकल्या जाणार्‍या गुटख्यावर पोलिसांनी धाड टाकत 50 हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री अकरा साडेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी विवेक पाटील यांच्या फिर्यादीवरून मोहंमद साबीर मोहंमद युसूफ मिल्लतनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मिल्लतनगर येथे गुटखा विक्री होत असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, हवालदार उमेश पाटील, कॉन्स्टेबल विनोद पाटील, महिला पोलिस भिलाला यांनी कारवाईत 50 हजार 72 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाई प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी शनिवारी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तपात हवालदार इक्बाल सैय्यद करीत आहेत.