चेअरमन नरेंद्र नारखेडे यांची माहिती
फैजपूर:- गेल्या 31 वर्षांपासून शहरात अखंडित व नियमित सुरु असलेली सातपुडा अर्बन क्रेडिट को- ऑफ सोसायटीस आर्थिक वर्ष 2017-18 या मध्ये संस्थेस 27 लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी दिली. सहकार कायद्यानुसार कराव्या लागणार्या तरतुदी सुद्धा शंभर टक्के पेक्षा जास्त केल्या आहेत तसेच संस्थेमध्ये सभासदांच्या ठेवी चार कोटी 32 लाख तर कर्ज तीन कोटी 13 लाख आहेत. संस्थेने पाच कोटी 63 लाख गुंतवणूक नियमानुसार जिल्हा सहकारी बँकेत केली आहे. सहकारी पतसंस्था सद्यस्थितीत अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत वाटचाल करीत आहे.
अनेक समस्यांवर मात करून संस्थेने आपले अस्तित्व अबाधीत ठेवले आहे. संस्थेची नियमित कर्ज वसुली, संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, ठेवीदारांचा आर्थिक विश्वास आणि कर्मचारी वर्गाची प्रामाणिक मेहनत यामुळे संस्था प्रगतीपथावर असून प्रतिवर्षी सभासदांना लाभांश दिला जात आहे. संस्था सामाजिक कार्यातही सहभागी होत असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण, शैक्षणिक कार्यात मदत करून संस्थेने गरीब विद्यार्थ्यांना हातभार लावला आहे.संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून चेअरमन नरेंद्र नारखेडे यांचे नेतृत्वाखाली कामकाज सुरु आहे. व्हा.चेअरमन चंद्रशेखर चौधरी, संचालक नितीन चौधरी, हेमराज चौधरी, पांडुरंग सराफ, पाद्यमाकर पाटील, गिरीश पाटील, प्रा एस जे पाटील, सुनिल वाढे, जयप्रकाश चौधरी, वासंती चौधरी, नयना चौधरी, व्यवस्थापक राजेश कानडे, काशिनाथ वारके, विजय सावकारे यांचे सहकार्य लाभत आहे.