फैजपूर:- शहरात गेल्या आठ दिवसापासून उन्हाचे चटके दुपारी चांगलेच जाणवू लागले आहे. शहरात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहराचे तापमान 39 अंशावर पोहोचल्याची नोंद मधुकर सहकारी साखर कारखान्यातील तापमापीवर नोंदवण्यात आली. एप्रिल महिना लागण्याआधीच नागरीकांना मार्च अखेरच उन्हाचे चांगलेच चटके लागायला सुरुवात झाली आहे. दुपारी तापमान जास्त असल्याने नागरीकसहसा घराबाहेर पडत नाही. या तापमानामुळे रस्त्यावर व सुभाष चौकात दुपारी पूर्ण शुकशुकाट दिसून येतो. दरवर्षी फैजपूर शहर तापमानाच्या बाबतीत हिटलिस्टवर असते. एप्रिल महिन्यात तापमान चांगलेच वाढण्याची शक्यता त्यामुळे दिसून येत आहे.