फैजपूर : आमोदा-बामणोद रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने फैजपूरच्या तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दीपक मधुकर पाटील (38, रा. फैजपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ीपक पाटील हे दुचाकीने भुसावळकडून फैजपूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.