फैजपूरच्या मसाका कामगारांना दिलासा, तीन पगार खात्यात वर्ग

0
डिस्टीलरी अखेर सुरू ; थूलथापांना बळी न पडता कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन
फैजपूर : 20 महिन्यारचा पगार आणि थकीत देणी मिळावी म्हणून मधुकर कारखान्याच्या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने कामगारांचे तीन पगार व 40 टक्के रिटेन्शन (बेकार भत्ता) कामगारांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. कामगारांनी कारखान्याचे हित जोपासून डिस्टिलरी सुरू केली आहे.