फैजपूरला जिल्हा परीषद शाळेतून साडेआठ हजारांचा तांदूळ लांबवला

0

फैजपूर- शहरातील जिल्हा परीषद मराठी मुलांची शाळा क्रमांक दोनमधून चोरट्यांनी आठ हजार 350 रुपये किंमतीचा अडीच क्विंटल लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता प्रकाश परमार्थी यांच्या फिर्यादीनुसार शालेय पोषण आहाराच्या खोलीचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 22 रोजीच्या सायंकाळी पाच वाजेनंतर व 23 जानेवारीच्या सकाळी सात वाजेदरम्यान आठ हजार 350 रुपये किंमतीचा अडीच दोन क्विंटल 50 किलो तांदूळ लांबवला. गुरुवारी सकाळी शाळा उघडताना ही चोरीची घटना उघडकीस आली. तपास हवालदार उमेश पाटील करीत आहेत.