फैजपूरला मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 200 रुग्णांची तपासणी

0

मोठे दवाखाने असून उपयोग नाही तर डॉक्टरांमध्ये हवी संवेदनशीलता -महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर- आश्रय फाउंडेशन यावल-रावेर तालुका आणि कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपूर आयोजित मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन खंडोबा देवस्थानच्या मंगल कार्यालयात करण्यात आले. अध्यक्षस्थानी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. उद्घाटन स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्‍वर पुरुषोत्तमदास महाराज, नगराध्यक्षा महानंदा होले उपस्थित होत्या. प्रास्ताविक आयोजक आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. महामंडलेशवर जनार्दन महाराज व शास्त्री भक्तीकिशोर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सहभाग नोंदविलेल्या 200 रुग्णांची मोतीबिंदू तपासणी कांताई नेत्रालयाचे चिकित्सक किरण जाधव यांनी केली. त्यासाठी जळगांव जिल्ह्याचे प्रमुख युवराज देसरडा यांनी सहकार्य केले. यावेळी आश्रय फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ.विशाल चौधरी, डॉ.दिलीप भटकर, डॉ.राजेश चौधरी, डॉ.ताराचंद सावळे, डॉ.अभिजीत सरोदे, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.ललित बोरोले रावेर, डॉ.प्रशांत भारंबे, डॉ.नितीन महाजन, डॉ.उमेश चौधरी, डॉ.भरत महाजन, डॉ.सुनील पाटील, डॉ.जी.एस.वर्मा उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू चौधरी तर आभार डॉ.पराग पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी संदीप भारंबे, नरेंद्र चौधरी, नामदेव भंगाळे, गौरव तळेले, कन्हैया चौधरी, सचिन भारंबे आदींनी परीश्रम घेतले.

संवेदनशीलता हा डॉक्टरांचा शृंगार -महामंडलेश्वर जनार्दन महाराज
यावर-रावेर तालुका मोतीबिंदू मुक्त व्हावा हा संकल्प धरून आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय ांनी जे कार्य सुरू केले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉक्टरांची संवेदनशीलता हा शृंगार आहे. चांगले कपडे, मोठ-मोठे दवाखाने असून उपयोग नाही तर त्या डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता असली तर रुग्ण हा आनंदी असतो. रुग्ण हा डॉक्टरांकडे संवेदनशीलता आहे म्हणून जातो आणि ती संवेदनशीलता या सर्व डॉक्टरांकडेमध्ये समाजाच्या हितासाठी आहे. म्हणूनच डॉक्टर हे त्यांचे काम सोडून सामाजिक कार्य करून आपणही समाजाच काही देणं लागतो ही भावना मनाशी ठेवून आपला वेळ काढून, असे कार्य करीत असल्याचे जनार्दन महाराज म्हणाले.

डोळे हे शरीराचा महत्वाचा घटक -शास्त्री भक्तिकिशोरदासजी
शरीरातील सर्वच घटक महत्वाचे आहे त्यात सर्वात महत्वाचा घटक डोळे आहे. डोळे नसले तर आपण जग बघू शकत नाही आणि परमेश्वराची साधना करू शकत नाही ज्या वयोवृद्धांना डोळ्यांनी कमी दिसते त्यांच्यासाठी आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रयाल यांनी हे कार्य सुरू केले आहे. परमेश्वराची साधने कुठे तरी आपल्या हातून कमी झाली असेल त्यामुळे डोळ्यांचे आजार लागले असावे, असे मला वाटते म्हणून देवाची साधना करत रहा, असे शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांनी सांगितले.