फैजपूर- शहरातील एका 27 वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 31 मे 2017 ते 4 एप्रिल 2018 दरम्यान फैजपूर येथील विवाहितेचा शिक्षक पती विजेंद्र प्रकाश सोनार, प्रकाश सोनार (सासरे), रजनी प्रकाश सोनार (सासू), सचिन सोनार (जेठ), नम्रता सोनार (जेठाणी), जितेंद्र सोनार (जेठ), सोनिया सोनार (जेठानी), नीलेश सोनार (जेठ), मनीषा सोनार (जेठाणी, रा.शिवाजी नगर, खुशालभाऊ रोड, फैजपूर) या सर्वांनी विवाहितेला घराचे कर्जाचे पैसे भरण्यासाठी दोन लाख माहेरून आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरीक छळ केला तसेच अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर ही विवाहिता पतीसोबत नांदावयास तयार असतानासुद्धा कोर्टाकडून नोटीस का पाठवली म्हणून जेठ सचिन सोनार याने माहेरून पैसे आणल्यावरच तुला वागवू, असे म्हणत पुन्हा शिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपनिरीक्षक आधार निकुंभे करीत आहेत.