फैजपूरातील जुगार अड्ड्यावर धाड ; पाच जुगारी गजाआड

0
 फैजपूर :- शहरात अवैध धंद्यांचा कहर झाला असून याबाबत सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी वाढल्यानंतर धाडी नदी पुलाजवळील श्रीराम टॉकीज शेजारी चालणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धाड टाकत पाच जुगार्‍यांना गजाआड केली.
आरोपींकडून तीन हजार 800 रुपये रोख व 16 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डब्लू.2659) जप्त करण्यात आली. संशयीत आरोपी प्रकाश रुपाचंद भालेराव (49), सद्दाम सुलेमान तडवी (27), शेख इम्रान शेख इसमान (28), राजू तुराब तडवी (40, रा.इस्लामपुरा, फैजपूर) व दशरत लालू भील (55, रा.दक्षिण बाहेरपेठ) यांच्या मुसक्या आवळण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे, कॉन्स्टेबल हेमंत सांगळे, किरण चाटे यांनी केली. दरम्यान, आरोपींची नंतर जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.