फैजपूर : पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या शहरातील 40 वर्षीय तरुणाने नैराश्येतून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. निलेश मोहन चौधरी (त्रिवेणी वाडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोटाच्या आजाराने तरुण होता त्रस्त
निलेश चौधरी हा रविवारी प्रांतःविधीसाठी आल्यानंतर त्याने गुरांच्या गोठ्यातील पत्री शेडच्या अँगलला दोराने गळफास घेतला. अनिरुद्ध सरोदे यांनी फैजपूर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मोहन लोखंडे, हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलिस नाईक उमेश चौधरी करीत आहेत.