रावेर- फैजपूर येथे पोलीस कर्मचारी महेंद्र महाजन यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रावेर शहरातील महात्मा फुले चौक येथून मूक मोर्चा काढण्यात आल. नायब तहसीलदार कविता देशमुख यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मूक मोर्चात टी.व्ही.महाजन, तुषार मानकर, भास्कर पहेलवान, उपनगराध्यक्ष अॅड.सुरज चौधरी, लालचंद पाटील, राहुल चौधरी, योगेश महाजन, पिंटू महाजन, ई.जे.महाजन, प्रदीप महाजन, अमोल महाजन, लखन महाजन, पिंटू दानी, रवींद्र महाजन, चेतन महाजन, डी.डी.वाणी, योगेश पाटील, रवी पाटील, रवींद्र महाजन, करण लोणारी, ईश्वर महाजन, जितेंद्र महाजन, विलास महाजन, संजय पाटील, बाळा महाजन, निखील महाजन आदींसह शहरातील नागरीक उपस्थित होते.