फैजपूर : शहरातील मुन्सिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापकांची ऑनलाईन 73 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील सहकार नगरातील हिवासी तथा मुन्सिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर तुकाराम तळेले यांच्या पत्नीस विद्युत बिलासंदर्भातील एक मॅसेज आला व तो मॅसेज त्यांनी तळेले यांना पाठवला. संबंधित मेसेज सोबत एक क्रमांक होता त्या क्रमांकावर तळेले यांनी संपर्क साधला असता संबंधितांने आपण महेश वर्मा, मेन ब्रांच बांद्रा. मुंबई येथून बोलत असून तुम्ही भरलेले विज बिल प्राप्त झाले नसल्याने मी सांगतो तो अॅप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले व अॅप डाऊन लोड झाल्यानंतर भामट्याने मोबाईलचा ऑनलाईन ताबा मिळवत तळेले यांच्या डेबीट कार्डचा क्रमांक मिळवत त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून प्रथम 49 हजार 132.80 रुपये आणि नंतर 14 हजार 330.40 रुपये आणि पुन्हा 10 हजार 236 रुपये असे एकूण तीन वेळा 73 हजार 699 रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करीत फसवणूक केली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिस करीत आहे.