फैजपूर : शहरातील सरस्वती नगरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात सोमवार, 24 जानेवारी रोजी सकाळी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिंद सुधाकर सरोदे (42, रा.सरस्वती नगर, फैजपूर, ता. यावल) यांची दुचाकी (एम.एच.19 सी.जी.2371) रविवार, 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहे.