विनाकारण शहरात नागरीकांची होतेय गर्दी
फैजपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे मात्र अत्यावश्यक सेवा या लॉकडाऊन मधून वळगण्यात आले असल्याने नागरी अत्यावश्यक सेवेच्या कारणाने विनाकारण घराच्या बाहेर पडून शहरात फिरतांना दिसत आहे. या अत्यावश्यक सेवांना वेळीची मर्यादा ठरवुन देण्यात यावी, अशी मागणी नागरीकत करीत आहेत. संपूर्ण देश कोरोना संसर्गजन्य आजाराने त्रासला आहे. यातच 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय असतांना सुद्धा नागरीक विनाकारण अत्यावश्यक सेवाचे कारण सांगून रोज शहरात फेरफटका मारत आहे. नागरीकांपुढे प्रशासन देखील हतबल झाले आहे. नागरीक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. जर एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडला ? तर परीस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे फैजपूरकरांना कळून न कळल्यासारखे आहे. जे व्यावसायिीक अत्यावश्यक सेवेममध्ये येत नाही अश्यांची पण काही दुकाने उघडी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना वेळेची मर्यादा पाळून देण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरीक करीत आहे.
डॉक्टरांची फाईल दाखवून पेट्रोलची खरेदी
पेट्रोल चालकांना अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही पेट्रोल देण्यात येऊ नये असे आदेश आहे. मात्र नागरीकांनी त्यावर नवीन शक्कल लढवली जात आहे. डॉक्टरांची फाईल सांगून अनेक नागरीक दुचाकी व चारचाकीत पेट्रोल व डिझेल टाकून घेत आहे. यातच जिल्हाधिकारी यांनीा केळीच्या वाहनासाठी डिझेल मिळेल असे आदेश दिले आहे. या पेट्रोल व डिझेल विक्रीवर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी अपेक्षा आहे.