फैजपूरात कुंभार वधू-वर परीचय मेळाव्यात 125 इच्छुकांनी दिला परीचय

0

फैजपूर- कुंभार समाजाच्या वतीने शहरात झालेल्या जिल्हास्तरीय वधू-वर परीचय मेळाव्यात 125 इच्छूकांनी परीचय दिला. रावेर-यावल तालुका कुंभार समाजाच्या वतीने स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर कापडे होते. कापडे म्हणाले की, वधू-वर मेळाव्यातून समाजातील गोर-गरीबांसाठी सामूहिक विवाह सोहळा सुध्दा घडवून आणण्याचा विचार करून समाजबांधवांनी त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास सुभाष पंडित, नगरसेविका पुष्पा मनोज कापडे, नगरसेविका वत्सलाबाई रघुनाथ कुंभार, माजी नगरसेवक बापू कापडे, विश्वनाथ कापडे, सखाराम मोरे, विलास न्हावकर, अशोक पंडित, प्रसिद्ध हाडवैद्य रघुनाथ लालू कुंभार यांच्यासह समाजातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक माजी नगरसेवक मनोज कापडे, घनश्याम हरणकर,विजय पंडित, संतोष कापडे,लीलाधर कापडे, किरण न्हावकर, वासू कापडे यांच्यासह शहरातील कुंभार समाजबांधवांनी परीश्रम घेतले.