फैजपूरात गावठी कट्ट्यासह तरुण जाळ्यात
नाशिक आयजींच्या पथकासह फैजपूर पोलिसांची संयुक्त कारवाई ः अटकेतील आरोपी भुसावळातील रहिवासी
भुसावळ : भुसावळातील 23 वर्षीय तरुणाला फैजपूर येथे संयुक्त कारवाईत गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगताना पकडण्यात आले तर गावठी कट्ट्याची विक्री करणारा संशयीत पसार झाला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक परीक्षेाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकासह फैजपूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. विशाल प्रकाश पाचपांडे (23, रा.गंगाराम प्लॉट, म्युन्सीपल हायस्कूलमागे, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर गावठी कट्टा देणारा शिकलकर (पार उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, एम.पी.) हा पसार असून दोघांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
दरम्यान, आरोपी विशाल पाचपांडे यांच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत राऊंड तसेच 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, ही कारवाई फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिध्देश्वर आखेगंवकर, एएसआय बशीर तडवी तसेच विशेष पथकातील हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाणे, राजेश बर्हाटे, किरण चाटे, चेतन महाजन, उमेश सानप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.