फैजपूरात तलवारीच्या धाकावर दहशत ; एकास शस्त्रासह अटक

0

फैजपूर- शहरातील सुभाष चौकात बुधवारी बाजाराच्या दिवाशी हातात तलवार घेवून दहशत माजवणार्‍या तरुणास पोलिसांनी सायंकाळी पाच वाजता अटक केल्याने खळबळ उडाली. शेख मुझम्मीन शेख हकीम (23, तहानगर, फैजपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सुभाष चौकातील आयसीआयसी बँकेजवळ शेख मुझम्मीन व त्याचा एक मित्र असे दोघे हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच हवालदार राजेश बर्‍हाटे, मोहन लोखंडे यशवंत टहाकळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच शेख मुझम्मीन हा तलवारीसह पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांना त्यास ताब्यात घेतले. तर त्याच्या सोबतचा पळून जाण्यास यशस्वी झाला. कॉन्स्टेबल राजेश बर्‍हाटे यांनी तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आधार निकुंभे करीत आहेत.