फैजपूर : शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामागील (पिंपरुड शिवार) एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोना आवाहल शुक्रवारी पॉझीटीव्ह आला आहे. दरम्यान, याच कुटुंबातील दाम्पत्याचा आवाहल पॉझीटीव्ह आला होता. एकाच कुटुंबातील बाधीतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, शहरातील रथगल्ली भागातील डॉक्टर व त्यांचा पुत्र या दोघांना सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याची माहिती नाशिक येथून पालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. डॉक्टर पिता-पूत्र हे नाशिक येथे उपचार घेत आहे तर रथगल्ली भागातील त्यांचे निवासस्थान परीसराला सील करण्यात आले असून निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे.