लोखंडी टॉमी लावून 32 हजारांची लूट
भुसावळ : फैजपूर शहरातील श्रीकृष्ण नगरात दरोडेखोरांनी दाम्पत्यास ओलीस ठेवून गळ्याला लोखंडी टॉमी लावत 31 हजार 700 रुपयांची लूट केली. सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी तीन अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश दामू बाणाईत व त्यांची पत्नी मीनाक्षी या झोपलेल्या असताना दरोडेखोरांनी लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत दाम्पत्याला धमकावत ओलीस ठेवले. सोमवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामलाल साठे करीत आहेत.