फैजपूरात पांडुरंगाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात

0

भुसावळ: 168 वर्षाची अखंड परंपरा लाभलेला येथील संत श्री खुशाल महाराज देवस्थानचा पांडुरंग रथोत्सवाला शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पांडुरंगाच्या जयघोषात सुरुवात झाली. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणार्‍या रथोत्सवासाठी फैजपूरसह परीसरातील भाविक दुपारपासून दाखल झाले होते.

अरे हा खुशाल ठाकला । येणे देव आकळीला
पैठणी श्रीखंड्यारावला, फैजपुरी तोची आला ।।

या ओवीची प्रचिती देणारा खुशाल महाराज देवस्थानाच्या 169 वर्षाच्या परंपरेचा वारसा लाभलेला पांडुरंग रथोत्सवाला रथगल्लीपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी पाचवे गादीपती पुंडलिक महाराज व प्रवीणदास महाराज यांच्याहस्ते पूजा-अर्चा झाली. स्वयंभू पांडुरंग भक्तांच्या भेटीला रथातून मार्गक्रमण करीत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.